Spread the love

इचलकरंजीचा पाणी प्रश्न कसा सोडवणार 

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा 

 खासदार धैर्यशील माने यांची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या रुकडीमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे. स्वतःच्या गावातील लोकांना पिण्याचे वेळेवर पाणी देऊ शकत नाहीत ते खासदार मताधिक्य देणाऱ्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न कसा सोडणार? असा सवाल शहरातून व्यक्त होत. 

उपसरपंच मालती इंगळे यांनी महावितरणला लिहिलेल्या कर्मणीत पत्र लिहिलेले खरमरीत पत्र सोशल मीडिया वरती व्हायरल झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान, ठेकेदारांचा घोळका आणि सुट बुट वाल्यांच्या गरड्यातून खासदारांनी बाहेर पडून गावाकडच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मापक अपेक्षा रूकडीकर व्यक्त करत आहेत.

 रुकडी शहराला पंचगंगा नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेले काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. नियोजन शून्य कारभारामुळे पाणी योजना सातत्याने बंद ठेवावी लागत आहे. गावातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत पाण्यावरून गावात तणावाची परिस्थिती आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यात रोज ठिणग्या पडत आहेत. याचा विपरीत परिणाम पाणीपट्टी वसुलीवर झालेला आहे. यामुळे वैतागलेल्या ग्रामपंचायत उपसरपंच मालती इंगळे आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप इंगळे यांनी हातकणंगलेच्या महावितरण कार्यालयास खरमरीत पत्र लिहून संताप व्यक्त केलेला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही या पत्रातून दिलेला आहे. जन्मभूमीत इतकी गंभीर परिस्थिती  असताना खासदार मात्र रुईकर कॉलनीतील एसी रूममध्ये निवांत आहेत. असं लोक बोलत आहेत. मालती इंगळे यांचे पत्र इचलकरंजीत शहरात सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाल आहे. त्यांच्या गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अशी असेल तर फुकटात मताधिक्य दिलेल्या इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार किती गंभीर असतील अशी कल्पना न केलेली बरी असे लोक बोलत आहेत.