Spread the love

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरामध्ये भाड्याने राहत असलेल्या कामगारानी घरकुलाच्या मागणीसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज 2016 मध्ये भरून दिले आहेत. घरकुलासाठी जागाही आरक्षित करण्यात आली आहे, असे असतानाही अद्याप बेघरांना घरकुले मिळाली नाहीत. याबाबतचा खुलासा महानगरपालिकेने करावा अशी मागणी करवीर कामगार संघाने केली आहे. मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे दिले आहे.

 केंद्र सरकारने सर्वासाठी घरे  ही महत्वकांक्षी योजना जून २०१५ रोजी जांहीर केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना डिसेंबर २०१५ रोजी शासन निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात ५१ शहराची निवड करण्यात आली. त्यामध्ये इचलकरंजी शहराची निवड करण्यात आली. इचलकरंजी नगरपालिकेने त्याप्रमणे २०१६ रोजी घरासाठी अर्ज वितरीत केले. इचलकरंजी शहरात भाड्याने रहात असलेल्या कामगार वर्गाने सर्व कागदपन्नासह परिपूर्ण अर्ज भरून फाईल करून ते नगरपालिकेत दिले. इचलकरंजी नगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घटक क्रमांक ३ भागीदारी तत्वावर परवडणा-या घराच्या निर्मितसाठी शासनाच्या मालकीची इचलकरंजी शहरातील शहापूर येथील गट क्रमांक ४६८ मध्ये घरे बांधण्यासाठी कौन्सील ठराव क्रमांक १२० नुसार २३-०६-२०१७ रोजी ठराव केला तो ठराव जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडे पाठविला. संघटनेच्या वतीने वेळोवेळी महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी,  नगरपालिका यांना गेली ८ वर्षे झाली बेघरांना घरे मिळावीत, म्हणून मोर्चे, निदर्शने आंदोलने केली आहेत. परंतु या नालायक सरकारने /अधिका-यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे अर्ज केलेल्या बेघरांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.

इचलकरंजी महानगरपालिका झाली, इचलकरंजी महानगरपालिकेनेही (प्रशासकानीही) जिल्हाधिका-याकडे घरासाठी पत्र व्यवहार केला आहे. परंतु केंद्रातील सरकारने व महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक २ जाहीर केला आहे व अर्ज मागविलेले आहेत. आवास योजनेसाठी पूर्व दिलेल्या अर्जाचे काय करणार याचा खुलासा होणे आवश्यक आहे. कारण पूर्वी दिलेले अर्ज जास्तीत जास्त ऑनलाईन भरलेले आहेत. त्यामुळे ऑनलाईन भरलेल्या अर्जाचा पूर्णपणे विचार व्हावा. त्यामुळे गोरगरीब कामगारांना त्याचा लाभ मिळावा. घरासाठी इचलकरंजी शहरातील ३५०० च्या वर कामगारांनी इचलकरंजी नगरपालिकेत परिपूर्ण अर्ज भरून दिले होते. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी  करवीर कामगार संघटनेने मंगळवारी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांचेकडे  निवेदनाद्वारे केली आहे .

यावेळी कॉ. हणमत लोहार .कॉ, विष्णू चव्सण कॉ. महेश लोहार  कॉ. दादासाो जगदाळे, शमीर दानवाडे कॉ. मिना भोरे कॉ. दादू मगदूम सुरेश देवकाने उर्मिल माने कॉ. हुसेन बी रोन्याळ, रेणूका जक्का, मालन कोळी, कॉ. प्रकाश गुख, माधवी तावरे उपस्थित होते