पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा
भुये, ता.करवीर येथून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन साक्षरी मोहीमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमराव माने होते. बोधगया मंदिर अधिनियम 1948 कायदा रद्द करण्याची मागणी, महोबाधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी, महाबोधी महाविहार ब्राह्मण वाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन या प्रमुख मागणीसाठी आंदोलन व स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे, असे उदगार भिमराव गोंधळी वंचित बहुजन आघाडी करवीर तालुका अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
यापुढेही जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्ती होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा असाच सुरू ठेवेल असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आभार नितीन कांबळे यांनी मानले.
यावेळी हिम्मत कुमार कांबळे, अर्जुन कांबळे करवीर सचिव, शिवाजी कांबळे, मनोहर कांबळे, जगन्नाथ कांबळे, प्रतीक कांबळे, धीरज खाडे, ऋषिकेश चव्हाण, शिवराज खाडे, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे, निलेश कांबळे, गौतम कांबळे, रामचंद्र माने, अभिजीत कांबळे, बाबासो कांबळे, सुनील कांबळे, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
