Spread the love

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

 इचलकरंजी शहरातील हमाल माथाडी कामगारांचा करार हा ३१ मार्च २०२५ रोजी संपला आहे. त्यामुळे  हमालीमध्ये दरवाढ करून मिळावी. या मागणीसाठी जनरल हमाल माथाडी कामगार संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी व दि गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांना देण्यात आले आहे.

 इचलकरंजी जनरल हमाल माथाडी कामगार संघटनेच्यावतीने हमालीच्या दराबाबतचा करार संपल्याने नवीन करार करून मिळावा व मजुरी वाढ मिळावी, यासह विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा  14 एप्रिल 2025 रोजी इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे व बी गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे यांना दिला होता.

निवेदनामध्ये, प्रत्येक करारात माथाडी काम करण्याऱ्या कामगाराला प्रत्येक टनाला ३ वर्षासाठी रू.५० ची वाढ द्यावी, ही वाढ दर तीन वर्षाला करून प्रत्येक बाचक्याला रू.९ प्रमाणे हमाली देणेत यावी, सहा चाकी ट्रक  रू.१,८०० प्रमाणे व दहा चाकी ट्रक  रू.२,५०० प्रमाणे वारणी मिळावी, ट्रक मधून ३० बाचक्या ऐवजी   ५० बाचक्याच्या पुढे डिलेव्हरी देण्यात येईल. अशा पद्धती चा नविन करार करावा, अशी जनरल हमाल माथाडी कामगारांच्या वतीने करण्यात आली होती. परंतू या मागण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने संघटनेने  सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनामध्ये अध्यक्ष शांताराम लाखे,  उपाध्यक्ष आदम शेख, सेक्रेटरी अजित ऐवळे,  खजिनदार शंकर बंडगे, शिवानंद कोळी, राजू देवकुळे, नागेश एकंची, बसवराज चिकमती, हेमंत ऐवळे, महंमद मुल्ला, अरविंद तलवार, मारुती महीमणी, सुरेश केंचन्नावार, दस्तगीर चित्तरगे, मानतेश मुक्ताहार यांचेसह इचलकरंजी शहरातील माथाडी हमाल कामगार सहभागी झाले.