Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

एक कोटी 21लाख रुपये फसवणूक प्रकरणी संशयित मयूर  अग्रवाल व प्रवीण  अग्रवाल याचा जमीन अर्ज इचलकरंजी येथील फौजदारी न्यायालयाने आज फेटाळला. सरकार पक्ष तर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला. 

आरोपी  यांचे वर भारतीय दंड संहिता 409, 406, 420, 465, 467, 468, प्रमाणे गुन्हा नोंद आहे, सदर गुन्हास  7 ते 10 वर्षे ची शिक्षा आहे , आरोपी यानी फसवणूक करण्याच्याउद्देशाने सूतमाल देतो  असे सांगून फिर्यादी यांचे कडून 1 कोटी 21 लाख रुपये घेतले आहे. परंतु सूत दिले नाही, आरोपी कडून अजून ती रक्कम जप्त झाली नाही, आरोपी याना जामीन दिलेस ते फर्म चे बँक स्टेटमेंट , ऑडिट रिपोर्ट, त्यांचे गोडावून रजिस्टर , कागदपत्रे नष्ट करणेची शक्यता आहे, आरोपी यांनी फिर्यादी यांचे देणे असणारे सूत ची परस्पर विक्री केली आहे त्या बाबत चा तपास सुरू आहे, आरोपी यांनी बनावट बिले तयार केली आहेत, आरोपी यांचे वर फसवणूकची आणखी तीन  गुन्हे दाखल आहे, व त्यामध्ये ही करोडो रुपये ची फसवणूक केली आहे, , आरोपी यांनी एका बँकेची ही  फसवणूक केली आहे, बनावट कागदपत्रे ती कोणी व कोठे तयार केली याचा तपास अजून सुरू आहे, आरोपी यांचे वर असच प्रकारचे अनेक गुन्हे आहेत,

आरोपी याना जामीन दिलेस तपासात अडथळा येणार आहे, तसेच ते पुरावा फोडणेची शक्यता आहे, युक्तिवाद मध्ये विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी अनेक सुप्रीम कोर्ट व उच्चन्यायालयाचे निकालाचे दाखले देऊन आरोपी यांचा जामीन फेटाळनेची  विनंती न्यायालयास केली , ती न्यायालयाने ग्राह्य मानून आरोपी यांचा जमीन अर्ज फेटाळला.