51 हजार रुपयांचे रोख बक्षीस व चषक
पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा.
कोतोली (ता.पन्हाळा) येथील जनसेवा ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महा केपीएल डे-नाईट क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये जनसेवा स्पोर्टस् क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी एबीसी स्पोर्ट्स ने ठेवलेल्या 63 धावांचे लक्ष आठ षटकात पाच विकेटातच सहज सहजी प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला.एबीसी स्पोर्टस् क्रिकेट संघाला द्वितीय तर तृतीय क्रमांक एस.डी. स्पोर्टस् क्रिकेट संघाना मिळाले.
नेहरू विद्या मंदिराच्या व ज्युनिअर कॉलेजच्या पटांगणावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील विजेत्य जनसेवा स्पोर्टस् संघाला बांधकाम व्यावसायिक सोपानदादा पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे ५१ हजार व चषक, द्वितीय एबीसी स्पोर्टस् क्रिकेट संघाला उत्तम जाधव, चेअरमन, साईनाथ मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी, कोल्हापूर यांच्याकडून ३१ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक एसडी स्पोर्टस् क्रिकेट संघाला त्यांना घुंगूर (ता.शाहूवाडी) चे उद्योजक युवराज पाटील यांच्याकडून १५ हजार रुपये विजेत्या संघांना देण्यात आले.
या महा केपीएल क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते झाले.स्पर्धेत सोळा सघांनी सहभाग घेतला होता.
बक्षीस वितरण प्रसंगी जनसेवा समूहाचे संस्थापक सागर वरपे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, एस. डी. पाटील, संभाजी सुतार, शामराव वरपे, सभांजी सुतार, कृष्णात पाटील, डॉ. प्रवीण घुगरे, डॉ. सुभाष चौगुले, डॉ. संदीप पोवार, सुरेश सातपुते, सुदीप पाटील, अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
