Spread the love

मुंबईसह महाराष्ट्रातील कोणती ठिकाणं?

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरु केली आहे. त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. देशभरातील 244 ठिकाणी युद्धा दरम्यानचे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. आज केंद्रीय गृहसचिवांची राज्यांच्या गृह सचिवांसोबतची बैठक पार पडली. या बैठकीत उद्या 7 मे रोजी होणाऱ्या मॅक ड्रिल होणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. राज्यात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.

देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन, क्रॅश ब्लॅक आऊटसह विशेष प्रशिक्षण दिले जाते. युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांच्या विमानांनी हल्ला केल्यास काय करावे, काय करू नये, याची माहिती दिली जाते. आणीबाणीच्या स्थितीत लोकांनी आपली काळजी घेण्यासह इतरांना कशी मदत करता येईल, याचे प्रशिक्षण मॉक ड्रिलमध्ये करण्यात येते.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर देशभरातील 200 हून अधिक शहरांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शहरांना तीन श्रेणीत विभागण्यात आले आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यातील जवळपास सगळ्याच शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात मॉक ड्रिल?

राज्यात मुंबईसह इतर ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. लष्कर आणि भारताच्या दृष्टीने ही शहरे अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे शत्रू राष्ट्रांकडून या शहरांना देखील लक्ष्य करण्यात येऊ शकते.

केंद्रीय गृहविभागाने जारी केलेल्या यादीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थळ-वायशेत या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन..

7 मे ला देशभरात सिव्हिल डिफेन्सचं मॉक ड्रिल करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहे. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्‌‍वभूमीवर मोठा निर्णय आहे. एअर रेड सायरन्सची चाचणी केली जाणार आहे. सर्वसामान्य, विद्यार्थ्यांना संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मॉक ड्रिलमध्ये घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आले आहे.

मॉकड्रीलमध्ये नेमकं काय होणार?

 हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार

 हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार

 रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणं समजू नये यासाठी ब्लॅकआऊटचं प्रशिक्षण देणार

 महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येणार

 सामान्य नागरिकांना बचावकार्याचं प्रशिक्षण दिलं जाणार

 घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचं महत्त्वं पटवून दिलं जाणार

मॉकड्रीलदरम्यान कुठे वाजणार सायरन?

प्रशासकीय भवन

सरकारी भवन

पोलीस मुख्यालय

अग्निशमन दल केंद्र मुख्यालय

लष्करी तळ

शहरातील मोठे बाजार

गर्दीची ठिकाणं

सायरन वाजताच नेमकं काय करावं आणि काय करु नये?

सायरन वाजताच घाबरून जाऊ नका.

 कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

 तताडीनं सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. किमान 5 ते 10 मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळ गाठा.

 मोकळ्या जागेपासून दूर राहा.

 रेडीओ, टीव्ही आणि शासकीय सतर्कतेच्या इशाऱ्यांवर लक्ष द्या.

 घरात किंवा एखाद्या सुरक्षित इमारतीत प्रवेश करा.

देश स्तरावर एकूण 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील पार पडणार असून, 1971 नंतर देशात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर नागरिक सुरक्षिततेच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आल्यामुळं ही सध्याच्या क्षणाची मोठी घडामोड ठरत आहे.