Spread the love

दीड हजार रुपयांची वाढ

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मागच्या चार दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण होत होती. मात्र आता या घसरणीला मोठा बेक लागला असून सोन्याचे दर 700 रुपयांनी तर चांदीचे दर 1700 रुपयांनी वधारले आहेत. चांदीची चकाकी वाढली आहे. त्याचा फायदा चांदीमध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना होणार आहे. 999 शुद्ध सोन्याचे दर 98 हजार 942 रुपयांवर पोहोचला आहे.

रिटेल मार्केटमध्ये 98 हजार 925 रुपये प्रति तोळा दर आहे. तर 23 कॅरेटचा दर 94 हजार 822 रुपये आहे. 22 कॅरेटचा दर 90700 रुपये तोळा आहे. तर 20 कॅरेटचा 82 हजार 452 रुपये आहे. ठढॠड नुसार 999 शुद्ध सोन्याचा दर म्हणजेच 24 कॅरेटचा दर 96603 रुपये आहे. 23 कॅरेटचा रेट 92 हजार 580 रुपये आहे. तर 22 कॅरेटचा दर 88 हजार 551 रुपये आहे.

उएऊ सह सोन्याचे दर विचार करायचा झाला तर 800 रुपयांची वाढ ही सोमवारच्या तुलनेत झाली आहे. उएऊ सह 24 कॅरेट सोन्याचे दर 99611 रुपये आहे. 23 कॅरेटचे दर 95 हजार 468 रुपये प्रति तोळा आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 91299 प्रति तोळावर पोहोचलं आहे. 20 कॅरेट सोन्याचे दर 83 हजार रुपये प्रति तोळ आहेत. सोनं चांदी सध्या खरेदी करू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सराफा बाजारात मोठ्या घडामोडी दिसत आहेत. त्यात ऐन लग्नसराई आणि गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून देखील सोन्याला मागणी आहे. परंतु, सतत बदलणाऱ्या दरांमुळे खरेदीदारांचे सोन्याच्या दरांकडे लक्ष आहे.चांदीच्या दर देखील एक लाखांच्या पार गेले होते. त्यात गेल्या काही काळात तब्बल 10 हजार रुपयांची घट झाली होती, मात्र आज पुन्हा वाढ पाहायला मिळाली.

28 एप्रिल 2025  96426 रुपये प्रति किलो

29 एप्रिल 2025  97,390 रुपये प्रति किलो

30 एप्रिल 2025  94,114 रुपये प्रति किलो

01 मे, 2025- बाजार सुट्टी

02 मे 2025  94,125 रुपये प्रति किलो

06 मे 2025 – 98047 रुपये प्रति किलो

06 मे 2025 – 98511 रुपये प्रति किलो