राज्यात 91. 88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण ठरलं अव्वल!
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12 वी (बारावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2025 च्या बारावी परीक्षेत एकूण 15 लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींनी बाजी मारली. तर, विद्यार्थी पिछाडीवर राहिले. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 89.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, 94.58 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.
कोकण विभागाने मारली बाजी…
यंदादेखील महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागातील 96.74 विद्यार्थ्यांनी बाजी मारली. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला.
विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे:
– कोकण – 96.14
– छत्रपतीसंभाजी नगर – 92.24
– मुंबई – 92.93
– पुणे – 91.32
– कोल्हापूर – 93.64
– लातूर – 89.46
– अमरावती – 91.43
– नागपूर – 90.52
– नाशिक – 91.31
