Spread the love

पुलाची शिरोली कुस्ती मैदनात झाल्या नामवंत कुस्त्या

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा

पुलाची शिरोली येथील दसरा मैदानावर पार पडलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत (शिवराम दादा आखाडा पुणे)चा मल्ल शुभम शिदनाळे याने  (छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डूवाडी)च्या महारुद्र काळे यास आस्मान दाखवले. तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये सुहास घोडके (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे) याने गणेश कुंकले (शाहूपुरी तालीम कोल्हापूर) याच्यावर मात केली.  यावेळी झालेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेत जीया सनदे (पुलाची शिरोली) हिने मानसी साळवी (मौजे वडगाव) हिचा चितपट केले.

शिरोली ग्रामपंचायत व उरूस कमिटीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती, पीर अहमदसो, पीर बालेचांदसो उरुस व श्री काशिलींग बिरदेव,म्हसोबा त्रैवार्षिक जळ यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. मैदानाचे पूजन व बक्षीस वितरण माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या मल्लांना रणजीत गावडे व उपसरपंच बाजीराव पाटील यांचेकडून चषक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

 या कुस्ती स्पर्धेसाठी माजी उपसरपंच कृष्णात करपे, अविनाश कोळी, उपसरपंच बाजीराव पाटील, बाजार समिती सभापती सुरेश पाटील, शिरोली विकासचे माजी चेअरमन धनाजी पाटील, डॉ.सुभाष पाटील, प्रकाशराव कौंदाडे, राजेश पाटील, विजय जाधव, बाळासाहेब पाटील, योगेश खवरे, दिपक यादव, संपत संकपाळ, बाबासाहेब बुधले, सतीश पाटील, सलीम महात, श्रीकांत कांबळे, प्रकाश शिंदे, सागर मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अन्य विजेते मल्ल असे शशिकांत भोंगार्डे, राघू शिंदे, वैभव यादव, श्रीमंत भोसले, रामा माने, आर्यन रानगे, आदेश तिरपणे, कार्तिक रानगे, आदील नायकवडे, इरफान अली यांनी विजय मिळविला. तसेच या स्पर्धेचे नियोजन पैलवान राम सारंग यांच्या मार्गदर्शकाखाली करण्यात आले होते.