यळगूड / महान कार्य वृत्तसेवा
देशभक्त रत्नापान्ना कुंभार पंचगंगा सह. साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारार्थ कारखान्याच्या माजी चेअरमन रजनीताई मगदूम यांनी यळगूड (ता.हातकणंगले) येथे धावती भेट दिली. यावेळी अत्यल्प काळात जवळपास पन्नासहुन अधिक सभासदांनी ताईंची भेट घेत जाहीर पाठिंबा व्यक्त केला. दरम्यान ताईंनी जवाहर साखर कारखाना संचालक अण्णासाहेब गोटखिंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निवडणुकी संदर्भात चर्चा केली.
कारखाना निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या सभासदांना संबोधित करताना ताई म्हणाल्या, केवळ लोकहित डोळ्यासमोर ठेवून अण्णांनी कारखान्याची उभारणी केली. मात्र काही केवळ स्व हीत पाहणाऱ्यांची वाकडी नजर कारखान्यावर पडली आहे. अशा मतलबी लोकांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. तसेच अण्णांनी दूरदृष्ठी ठेवून पाहिलेले स्वप्न आपण सगळे मिळून साकार करूया यासाठी आपण मला दिलेला पाठिंबा माझ्यासाठी लाख मोलाचा ठरेल. यात शंका नसल्याचे ताईंनी सांगितले.
यावेळी स्वर्गीय अण्णांची नात डॉ.पूजा पाटील, अण्णासाहेब पाटील, सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते सह पाणी पुरवठ्याचे मा चेअरमन गणपतराव बागल, पुंडलिक जाधव, अरविंद घुणके, प्रकाश कागले, उत्तम कागले, राजेंद्र मांगूरकर यांच्यासह पन्नासहुन अधिक सभासद उपस्थित होते.
