सर्वच शाळांची उज्वल परंपरा
निकाल पाहण्यासाठी उत्सुकता
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)
राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने सोमवारी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात शहरातील 4 ज्युनिअर कॉलेजनी 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. यामध्ये इचलकरंजी हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, बिशप्स इंग्लिश स्कूल, व्यंकटराव हायस्कुल आणि व्यंकटेश्वरा हायस्कुल ज्यु. कॉलेज यांचा समावेश आहे. निकाल जाहीर होताच तो पाहण्यासाठी शहरातील सर्वच नेट कॅफेवर विद्यार्थी व पालकांची गर्दी केली होती. तर मोबाईलवरदेखील पालकांनी निकालाची खातरजमा केली.
दुपारी 1 वाजल्यानंतर इंटरनेटवर निकाल जाहीर होणार असल्याने सकाळपासून सर्वांना हुरहूर लागली होती. निकाल पाहण्यासाठी सर्वच नेट कॅफेच्या ठिकाणी पालकांसह विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. तसेच मोबाईलवरही निकाल पाहिला जात होता. निकालानंतर काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम असे चित्र पाहण्यास मिळत होते. शहरात 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखणार्या तसेच उज्वल यश मिळवणार्या महाविद्यालयांच्या आवारात निकाल जाहीर होताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शहरातील महाविद्यालये आणि मिळालेली टक्केवारी पुढीलप्रमाणे –
इचलकरंजी हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (100) , व्यंकटराव हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (100), बिशप्स इंग्लिश मेडियम स्कुल 54 विद्यार्थी (100), व्यंकटेश्वरा हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, कबनूर (100), तात्यासो मुसळे हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (99.71), श्री बालाजी माध्यमिक विद्यालय ज्युनिअर कॉलेज (99.61), नॅशनल हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (98.60), मणेरे हायस्कूल ज्युनिअर कॉलेज (99.00), श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (96.24), गोविंदराव हायस्कूल ज्युनिअर कॉलेज (92.37), आक्काताई रामगोंडा पाटील महाविद्यालय (95.00), ताराबाई गर्ल्स हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (96.15 ), रत्नदिप हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (82.14), कबनूर हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज (85.71) तर गर्ल्स हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स (87.87), मयूर गर्ल्स हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, दत्ताजीराव कदम एएससी कॉलेज, दि न्यू हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, नाईट कॉलेज आर्टस अॅन्ड कॉमर्स यांनी देखील आपल्या उज्वल निकालाची परंपरा यावर्षीदेखील कायम ठेवल्याचे दिसून आले.
