Spread the love

प्रकाशअण्णांचा मास्टर स्ट्रोक

आवाडे बँक, आयको, इंदिरा, जवाहरनंतर आता नवमहाराष्ट्र

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची बोंबाबोंब सुरू असताना दुसऱ्या बाजूला माजी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी त्यांच्या अधिपत्याखाली सर्व संस्थाच्या निवडणुका बिनविरोध  करून सहकारांमध्ये एकहाती सत्ता राखली आहे. सोमवारी नवमहाराष्ट सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध पार पडली. आणि अण्णांच्या नेतृत्वावरती सभासदांनी विश्वास व्यक्त केला. नवमहाराष्ट्र सूतगिरणीची निवडणूक होण्यासाठी माणगावचे आदर्श सरपंच राजू उर्फ आप्पासाहेब मगदूम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तर आमदार राहुल आवाडे, जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवडे यांचे मार्गदर्शन लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.

दरम्यान,  संचालक मंडळ निश्चित करताना प्रकाशअण्णांनी नवीन 11 तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच हातकणंगले आणि इचलकरंजी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समतोल ही राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 11 जणांना तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील 9 नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

आवाडे दादांची चौथी पिढी सहकारात

सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांचे सहकारातील योगदान विसरता येण्यासारख नाही. त्यांनी उभा केलेल्या सहकाराच्या माध्यमातून हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, सीमा भागातील अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला. हाच आदर्श घेऊन चौथ्या पिढीनेही ही परंपरा कायम ठेवावी त्यांना सहकारातील अनुभव हवा या उदात हेतूने दादांची चौथी पिढी म्हणजेच आमदार डॉ. राहुल आवाडे यांची कन्या सानिका यांनाही या सूतगिरणीत संचालक म्हणून संधी देण्यात आलेली आहे.

माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील 13 गावांमध्ये आजही आवाडे गटाचे वर्चस्व आहे. हे विधानसभेच्या निवडणुकीवेळी सिद्ध झाले आहे. आमदार अशोकराव माने यांना 13 गावातून उच्चांकी मतदान आवाडे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले. या गावावर असलेली आपली पकड मजबूत व्हावी व राहावी या हेतूने माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी याच 13 गावातील 9 तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे.

राजू मगदूम यांचे कौशल्या

मागील चार वर्षांपासून सूतगिरण्या अडचणीत आहेत. या बिकट परिस्थितीत  सूतगिरणीतील दैनंदिन कामकाजाची जबाबदारी राजू मगदूम यांच्यावरती सोपवण्यात आली होती. त्यांनी अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे कारभार पाहत उत्पादन सुरू ठेवली सुतगिरणी बंद ठेवली नाही.