शिवाजीनगर पोलिसांची अंदर की बात
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील जिल्हा बँकेच्या इमारती लगतच एका पान टपरीत खुलेआम मटका घेतला जात आहे. जिल्हा बँकेतून पैसे काढा आणि खोक्यात मटक्याच्या माध्यमातून पोलिसांना हप्ता देऊन जावा, असेच चित्र या ठिकाणी सोमवारी पाहायला मिळाले.
सध्या लाडक्या बहीण आणि वृद्ध निराधार योजनेचे पैसे जिल्हा बँकेत जमा झालेले आहेत. बँकेच्या उत्तर दिशेला एक पान टपरी आहे. या ठिकाणी वृद्धांना बसण्यासाठी खास बाकड्यांची व्यवस्था केली आहे. याच बाकड्यांवर मटक्याचा चार्ट घेऊन टिप्सर नशीबवान आकडा काढत असतात तर या ठिकाणी असलेले वृद्ध निराधार टिप्सर आणि मटका लावण्यासाठी आलेले एकमेकांशी चर्चा करत असतात. ही चर्चा ऐकून अनेक जण बँकेतून पैसे काढून या टपरीत मटका लावतात अशी चर्चा ऐकायला मिळाली.
राज्य सरकारचा हेतू असफल
ही चर्चा ऐकून अनेक वृद्ध निराधार मिळालेल्या पेन्शनचे पैसे या मटक्यावर लावतात जादा पैसे मिळतील या अशाने. परंतु यातून कोणाचही अद्याप भल झालेले नाही. हे वास्तव आहे. राज्य सरकारने वृद्धांना आधार मिळावा म्हणून योजना सुरू केल्या योजनेचे पैसे अशा पद्धतीने मटक्याच्या माध्यमातून पोलिसांच्या खिशात जात असतील तर यापेक्षा दुर्दैवी कुठलेही नाही. वरिष्ठ अधिकारी यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी भाबडी अशा वृद्धांच्या नातेवांची आहे. अपर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानिक आहेत. परंतु त्यांनीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही.
