Spread the love

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा
जिल्ह्यातील भाजपच्या सर्व मंडल अध्यक्षांच्या निवडी पूर्ण होत आल्या तरी इचलकरंजीतील निवडींना अद्याप मुहूर्त सापडलेला दिसत नाही.  निवडीची घोषणा करण्यासाठी कदाचित त्या तोलामोलाच्ा भटजी मिळाला नसेल असे भाजपमध्ये उपाहासात्मत बोलले जात आहे.
शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षांवरील कामाचा अतिरिक्त तान कमी व्हावा, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीजास्त लोकांपर्यंत महायुतीचे काम पोहवण्यासाठी तालुका, शहराध्यक्षांना समांतर यंत्रणा म्हणून भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी मंडल अध्यक्ष ही संकल्पना आणली. राज्यभरात निवडीचा धडाका सुरु असताना इचलकरंजी शहरात मात्र कमालीची सामसूम दिसू लागली आहे.
शहरात 3 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. एका जागेसाठी 3 या प्रमाणात 3 जागांसाठी 9 जणांची यादी प्रदेशकडे पाठवण्यात आली आहे. मात्र  या यादीवर अद्याप निर्णय झाला नाही. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर मुंबईहून परतल्यानंतर नावांची घोषणा होणार, असे सांगण्यात आले होते. परंतु 15 दिवस झाले तरी घोषणेची प्रतिक्षाच आहे.

प्रकाशआण्णांची नाराजी
मंडल अध्यक्षांच्या शिफारस केलेल्या नावांच्या यादीत आवाडे समर्थकांना वगळल्याची चर्चा पुढे आल्यानंतर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी एका समारंभात तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे कळते. कदाचित या नाराजीमुळे निवडी लांबणीवर टाकल्या असाव्यात अशी कुजबुज भाजप वर्तळात आहे. आता पहावे लागले, ही नाराजी दूर करण्यासाठी हाळवणकर कोणता तोडगा काढतात.