filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 42;
Spread the love

निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनाचा आमदार अशोकराव मानेंना विसर?

यळगूड / महान कार्य वृत्तसेवा

जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते, हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार दलितमित्र अशोकराव माने यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले विधानसभा मतदार संघातील शेवटचे गाव मौजे यळगूड ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील बसस्थानक परिसरातील व्यापाऱ्यांच्या मागणीवरून बसस्थानक परिसरात पेविंग ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन देत प्रत्यक्ष कामाच्या शुभारंभासाठी जवळपास अर्ध पोतं नारळ फोडले होते. मात्र सध्या विद्यमान आमदार  अशोकराव माने (बापू ) यांना या कामाचा विसर पडलाय? की काय अशी चर्चा येथील बसस्थानक परिसरात अगदी येथून कोल्हापूर, इचलकरंजी आणि कागलकडे जाणाऱ्या प्रवाशासमोर सुरु आहे.

धडाधड नारळावर नारळ फोडून पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ झाल्याने येथील अनेकांनी निवडणूक काळात बापूंच्या प्रचारार्थ निघालेल्या अनेक प्रचार फेरीत सहभाग  नोंदवत गगनभेदी घोषणाही दिल्या होत्या. मात्र आता नारळ फोडणारे आणि ते नारळ आणून देणारे देखील शुभारंभ झालेल्या कामाच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे ज्यांनी या कामाची मागणी केली त्यांच्याकडे आता आपापसात चर्चा करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरला नाही.

एखादे आश्वासन मिळाले की त्याची पूर्तता होण्याची वाट पाहणे हा मानवी स्वभाव आहे. मात्र हे आश्वासन निवडणुकीपूर्वी मिळाले होते. आणि अशा काळात चुनावी जुमले करावे लागतात  हे अद्याप मौजे यळगूड तालुका हातकणंगले येथील बसस्थानक परिसरातील लोकांना समजलेले दिसत नाही. म्हणूनच येथील पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाला कधी सुरवात होणार याची चर्चा दररोज न चुकता रंगलेली असते .