Spread the love

इतर वारस बनले बेघर

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा (विद्याधर कांबळे)

शिये (ता.करवीर) येथील मधुकर गणपती पाटील यांनी पोलीस पाटील सौ.मनीषा विजय सिसाळ यांना हाताशी धरून  इतर वारस हयात असताना आपल्या एकट्याची वारस नोंद करून घेतली आहे. अशी तक्रार त्यांचा पुतण्या  अवधूत विष्णू पाटील व  रघुनाथ गणपती पाटील यांनी करवीरचे उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.

 सविस्तर माहिती अशी की, शिये येथील कै. गणपती परसु पाटील यांना तीन मुले व दोन मुली आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मधुकर गणपती पाटील यांनी इतर वारसांना कोणताही थांगपत्ता न लागता पोलीस पाटील सौ.मनिषा विजय सिसाळ यांच्याकडून आपण एकमेव वारस असल्याचा दाखला घेतला. आणि त्याआधारे भूमिअभिलेख कार्यालय येथे दप्तरी वारस नोंद करून घेतली. 

एकंदरीत मधुकर गणपती पाटील यांनी पोलीस पाटील व भूमिअभिलेख कार्यालय यांना हाताशी धरून बोगस वारस नोंद करून घेतली आहे.

तरी या सर्वांवर गैरव्यवहार केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, तसेच ही बोगस वारस नोंद रद्द करून आम्हा सर्व वारसांची रितसर नोंद करून आम्हाला न्याय द्यावा अशी तक्रारीत म्हटले आहे. यानिमित्ताने पोलीस पाटील व भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.