Spread the love

काश्मीरचा मुद्दा उपस्थित  ; डोनाल्ड ट्रम्पकडे याचना

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिझवान सईद शेख यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, काश्मीरचा वाद हा भारत-पाकिस्तान संबंधांच्या मुळाशी आहे आणि तो सोडवणे हा तणाव कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे. या दरम्यान, त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हा ”परमाणु फ्लैशप्वाइंट” सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलंय.

भारत-पाकिस्तान युद्धामुळे ‘अणुशस्त्र’ पर्यायनिर्माण होऊ शकतो, हे शेख यांचे विधान राजकीय दबाव निर्माण करण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास भाग पाडण्यासाठी धोरणात्मक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. वेिषकांचा असा विश्वास आहे की पाकिस्तानकडून अनेकदा जागतिक लक्ष वेधण्यासाठी अशी विधाने केली जातात, परंतु ही परिस्थिती संवेदनशील आहे आणि जर हे शब्द कूटनीतीचा भाग असले तरी त्यांचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. असेही सांगितलं जातंय.

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीचे आवाहन

रिझवान सईद शेख पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा काश्मीरमध्ये तणाव निर्माण होतो तेव्हा जगाचे लक्ष त्याकडे जाते, परंतु काही काळ शांतता होताच जग त्याकडे डोळेझाक करते. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मात्र असे असले तरीही पाकिस्तानची ही एक जुनी रणनीती आहे. ज्यामध्ये पाकिस्तान भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि इतर देशांसमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतो.

चौकशीपूर्वी आरोप करू नका – पाकिस्तान

या दहशतवादी हल्ल्याची मुळे पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा भारत सरकारकडून केला जात आहे. सुरुवातीच्या तपासात याचे पुरावेही सापडले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने भारताची भूमिका नाकारली आहे आणि म्हटले आहे की भारत कोणत्याही पुराव्याशिवाय खोटे आरोप करत आहे. भारताने म्हटले आहे की हा हल्ला सीमापार दहशतवादाचा एक भाग आहे जो दशकांपासून काश्मीरला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.