वादळी पावसाची भिती ; पत्रे त्वरित बदलण्याची गरज
इचलकरंजी / महान कार्य विशेष
आयुष्यभर काबाड कष्ट करून मरण यातना भोवणाऱ्या सर्वसामान्य माणसाला मृत्यूनंतर तरी समाधानाने अंत्यसंस्कार करून घेता येतील अशी भाबडी अशा लागून राहिलेली असते मात्र येथील स्मशान भूमीतील फुटलेल्या पत्र्यांमुळे मरणानंतर देखील सर्वसामान्य माणसाच्या मृतदेहाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. फुटलेले हे पत्रे त्वरित बदलण्याची मागणी केली जात आहे
काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे येथील पंचगंगा नदी घाटावरील स्मशानभूमीचे पत्रे फुटून पडले आहेत. आता पावसाळा सुरु होणार असून त्वरीत हे पत्रे न बसवल्यास अंत्यसंस्कार करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे स्मशानभूमीचे पत्रे त्वरीत बसवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतुन केली जात आहे.
येथील नदीकाठावरील स्मशानभूमीमध्ये चाणक्य सेवाभावी संस्थेच्यावतीने गेली 22 वर्षे अंत्यसंस्काराचे कार्य अविरत सुरू आहे. या स्मशानभूमीतील पत्रे वर्षापूर्वी बदलले आहेत. पण फिटींग व्यवस्थित न झाल्याने 27 एप्रिल रोजी झालेल्या वादळी वार्यामुळे स्मशानभूमीच्या शेडचे पत्रे उडून पडले आहेत. आता वळीव पाऊस आणि पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे शेडचे पत्रे त्वरीत बसवणे गरजेचे आहे. अन्यथा अंत्यसंस्कार करणे अवघड आणि त्रासाचे होणार आहे. त्यामुळे त्वरीत शेडचे पत्रे बसवण्याचे काम सुरु होणे आवश्यक आहे.
कोट-
स्मशानभूमीतील फुटलेल्या पत्र्यांची त्वरित नव्याने व्यवस्था करावी अशी मागणी आम्ही महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे, वादळी पाऊस किंवा मोसमी पाऊस सुरू झाला तर या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी निर्माण होणार आहे बघूया आता प्रशासन हे काम कधी पूर्ण करते – जवाहरजी छाबडा.
