Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा

20 टक्के कमिशन मिळवण्याच्या आमिषाने सिगारेट खरेदी करण्याच्या बहाण्याने  नकली नोटा खपवण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोनशे रुपयांच्या दोन बनावट नोटा संशयित आरोपींच्या कडून हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पंकज संभाजी पोवार (वय 30, धंदा – पान शॉप रा. विनायक हायस्कुलसमोर अवधुतनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद रामचंद्र पोवार (रा. सुतारमळा,  इचलकरंजी), अवधुत प्रकाश पोवार (रा.सुतारमळा) अर्जुन दळवी (रा.विकली मार्केट जवळ) ओकार साळुंखे (रा.इचलकरंजी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  1 मे रोजी रोजी दुपारी 3 वा. चे सुमारास तसेच  3 मे रोजी सकाळी  8 वाजण्याच्या दरम्यान  फिर्यादी यांचे विनायक हायस्कुलचे बाजुला असले माऊली पान शॉप शहापूर या ठिकाणी अवधुत  पोवार, अर्जुन दळवी यांनी तयार केलेल्या बनावट नोटा घेवून प्रमोद पवार व अवधूत पवार या दोघा जणांनी फिर्यादी यांचे वडील यांच्याकडे 5BH 550630 या एकाच क्रमांकाची दोनशे रुपयांचे नोट देऊन सिगारेट घेण्याच्या बहाण्याने ती खपवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर पंकज पवार यांनी याबाबतची फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

दरम्यान पोलिसांनी प्रमोद पोवार व अवधूत पोवार यांना अटक केली असून मुख्य संशयित अर्जुन दळवी, ओंकार साळुंखे हे फरार झाले आहेत. दळवी आणि साळुंखे हे दोघेही पोलीस रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.