Spread the love

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या गोकुळ शिरगाव ते शिरोली यादरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या [ पठाण मळा ते गोकुळ शिरगाव ] जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शिरोली औद्योगिक क्षेत्रामधील पाणीपुरवठा  सोमवार दि ५ मे २०२५ रोजी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

 तसेच मंगळवार, दिनांक ६ मे २०२५ रोजी होणारा पाणीपुरवठा अपुऱ्या दाबाने असणार आहे, याची उद्योजकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

तरी सर्व औद्योगिक, घरगूती व ग्रामपंचायत ग्राहकांनी पुरेसा पाणीसाठा करून महामंडळात सहकार्य करावे असे  आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.