पोलीस यंत्रणा गतिमान
जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये रात्रीच्यावेळी पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस खरोखर सक्रिय आहेत की नाहीत. यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये एकूण 39 ठिकाणी क्यू आर कोड बसवण्यात आलेले आहेत. यामुळे घरफोडी व चोरील महिला अत्याचाराला आळा बसणार आहे. अशी माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली.
जिल्हा पोलीस प्रशासनाने रात्रीच्यावेळी पोलीस पेट्रोलिंग करत असताना खरोखर प्रत्येक गावामध्ये पोलीस जातात की नाही. यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रत्येक गावामध्ये क्यूआर कोड बसवले आहे . ज्या गावांमध्ये पोलीस पेट्रोलिंग करण्यासाठी जातात त्या ठिकाणी मोबाईल फोनवर जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या ॲपवरून स्कॅन केल्यानंतर जिल्हा पोलीस कार्यालय व स्थानिक पोलीस ठाण्यात याची माहिती कळते. यामुळे यापुढील काळात पेट्रोलिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सक्षम केली आहे. जयसिंगपूर पोलीस ठाणे अंतर्गत 11 गावांमध्ये दोन चार चाकी वाहने प्रत्येक वाहनांमध्ये दोन कर्मचारी या पद्धतीने पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.
याबरोबरच 112 या कॉलिंग सुविधेल प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असून महिन्यातून 120 च्या दरम्यान कॉल येतात 112 या यंत्रेनेला संबंधितांकडून कॉल आल्यानंतर सहाव्या मिनिटात 112 चे वाहन त्या ठिकाणी हजर राहणार आहे. 112 मुळे महिला अत्याचार व आत्महत्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. नागरिकांनी कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास तात्काळ 112 या कॉलिंग सुविधेल फोन करावे असे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी आव्हान केले आहे. एकंदरीत जयसिंगपूर पोलीस प्रशासन अत्याधुनिक व सक्षम होत असल्याने गुन्हेगारी घरफोडी चोऱ्या महिला अत्याचारचे प्रमाण कमी होत असल्याचेही पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले.
