Spread the love

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा

पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा (ता.हातकणंगले) येथील दि कोल्हापूर स्टील समोर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे.

सदर महिला रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने चिरडले असून त्या वाहनाची दोन्ही चाके त्या महिलेच्या पायावरून गेली आहेत. या महिलेच्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. बराचवेळ ती महिला जिवाच्या आकांताने विव्हळत पडली होती. जिवंतपणी मरणयातना  भोगत  असताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येत आहेत.

सदर जखमी महिलेचे नातेवाईक मिळाल्यास तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन शी संपर्क करावा असे आव्हाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी केले आहे.

नागाव फाटा व मयूर फाटा येथे स्पीड ब्रेकरची आवश्यकता

अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरचा मुद्दा चर्चेत आला आहे. नागाव फाटा व मयूर फाटा येथे वाहतूक सेवा रस्त्याने वळविली आहे. त्यामुळे वाहने  भरधाव वेगाने येत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. रस्ते महामंडळ आणखीन किती बळी जाण्याची वाट पाहत आहेत. अशा तीव्र प्रतिक्रिया वाहनधारक व नागरिकांच्यातून उमटत आहेत.