Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा 

इचलकरंजी वस्त्रोद्योगाची ‘आन, बान आणि शान आहे असे गौरवोदगार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी डीकेटीईमध्ये व्यक्त केले.  पंतप्रधान  नरेंद्र मोदींजींच्या संकल्पनेतून वस्त्रोद्योग उत्पादन एक्सपोर्ट करण्यावर उदयोजकांनी भर दयावा असे आवाहन त्यांनी उपस्थित युवा उदयोजकांना केले. यावेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इन्स्टिटयूटमध्ये त्यांचे स्वागत केले.
भेटीदरम्यान मान्यवरांनी संस्थेच्या विविध विभागांना भेट देवून सुरु असलेल्या शैक्षणिक व संशोधन कार्याचा आढावा घेतला. त्यांनी तृतीय व अंतिम वर्ष बी.टेक टेक्स्टाईलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प पाहून विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट संशोधनाचे अभिनंदन केले. 
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी  संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. 
यावेळी खासदार धैर्यशिल माने, आमदार डॉ राहूल आवाडे, आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी सुनिल पाटील, डॉ ए.बी. सौंदत्तीकर, एस डी पाटील, अनिल कुडचे, स्वानंद कुलकर्णी, शेखर शहा, कार्यकारी संचालक रवी आवाडे, वैशाली आवाडे, मोसमी आवाडे, डायरेक्टर डॉ एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे. पाटील यांचेबरोबरच वस्त्रोद्योगातील उदयोजक, तज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.