Spread the love

प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेल्या आत्मदहन प्रयत्न प्रकरणानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन  चांगलीच झाडाझडती घेतली.
 पोलीस ठाण्यातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे असणारी प्रलंबित प्रकरणे, सोयी सुविधा यांचा आढावा घेतला. शनिवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक ठाण मांडून बसले होते.
दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाणे आवारात शेखर गायकवाड याने पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्याच्या आवारात  घडलेल्या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांनी सर्वांना बोलावून चौकशी केली. त्यानंतर शनिवारी अधिक्षक पंडीत यांनी भेट दिेली. जिल्हाप्रमुख पंडीत यांनी सुरुवातीला संपूर्ण पोलीस ठाणे फिरून पाहणी केली. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत वैयक्तिक संवाद साधला. काहींना कडक शब्दात सुचना दिल्या. परंतु झाडाझडतीबाबतचा अधिक तपशिल मिळाला नाही. यावेळीे अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधिक्षक समिरसिंह साळवे, निरीक्षक सचिन पाटील उपस्थित होते.