आगीचे रौद्र रूप: पन्हाळा नगर परिषद अग्नीशामक दल व गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात
पन्हाळा: महान कार्य वृत्तसेवा
मसाई पठारावर असणाऱ्या म्हाळुंगे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे आज दुपारी दोनच्या सुमारास आग लागून गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. म्हाळुंगे येथील ग्रामस्थांचे एकत्रित शेणी (गोवऱ्या) लावण्याचे ठिकाण आहे. संपूर्ण गावच्या शेणी एकाच ठिकाणी असलेने आगीने रौद्र रूप धारण केले. या ठिकणी गावकऱ्यांच्या जवळपास दिड ते दोन लाखांच्या आसपास शेणी आहेत. सभोवताली झाडे व झुडपे मोठ्या प्रमाणात असलेने आगीचे लोट ३० ते ४० फूट उंच उठत होते. आग लागल्याचे लक्षात येताच गावतील लहान मुलांसहीत महिला व तरुणांनी झाडांचे ढहाळे व पाणी टाकूण आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगिचे लोट मोठे असलेने आग विझवणे अशक्य होत होते. पन्हाळा नगरपरिषदेचा अग्निशामक दलाचे अग्निशामक बंब वेळेत पोहोचल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अनेक लोकांच्या शेणी जळाल्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये युवराज महाडीक , नामदेव दाभोळकर , दत्तात्रय दाभोळकर , अशोक महाडीक , सागर महाडीक यांच्या शेणींचे लावलेले गोवर ( ढीग ) आगीत भस्मसात होऊन हजारो शेणी जळून खाक झाल्या.
आग लागलेल्या परिसरात मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांनी चूल मांडून जेवण केले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी चूल विझवली नव्हती. त्यामुळेच या ठिकाणी आग लागली. त्यामुळे पठारावर येणाऱ्या व उघड्यावर जेवण करणाऱ्यांवर बंधन घालून कठोर कारवाईची गरज आहे.