मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. अमीन पटेल यांची विधानसभेत उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तर दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमति देशमुख यांच्याकडे मुख्य प्रताोद म्हणून जबाबदारी सोपविलीय. विधिमंडळाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याची जबाबदारी नव्या आणि तरुण आमदारांवर सोपविण्यात आलीय.
अमित देशमुख यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पक्षाच्या विधिमंडळ पक्ष समतीिच्या नियुक्त्या जाहीर केल्यात. मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातील आमदार अमीन पटेल यांना उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आलीय. लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पळूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम हे सचिव तर, नवापूर येथील आमदार शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राम यांची प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आलीय. संजय मेश्राम हे उमरेड येथील आमदार आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे, त्यानंतर या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात. विधानसभेत काँग्रेसचे 16 आमदार आहेत.
विधान परिषदेत सतेज पाटलांना जबाबदारी : विधान परिषदेत कोल्हापूरचे सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती केलेली आहे. तर, नागपूरचे अभिजीत वंजारी हे मुख्य प्रतोद तर, राजेश राठोड यांची प्रतोद म्हणून नुियक्ती करण्यात आलीय. राजेश राठोड हे जालन्यातील आहेत.
नवे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेत्यांची केली होती नियुक्ती : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 13 फेब्रुवारी रोजी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली होती. त्याचवेळी विजय वडेट्टीवार यांचीही काँग्रेसचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 3 मार्चपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.