यळगूड /महान कार्य वृत्तसेवा
गट प्रमुखांच्या एकाधिकारशाहीला वैतागलेले, गेल्या दोन तीन वर्षांपासून पदाला मुकलेले, यळगूड गावात चौथा राजकीय गट निर्माण होऊ शकतो अशी विचारधारा जुळलेले आणि गेल्या अनेक वर्षांपासून जंग जंग पछाडून मिळवलेली सत्ता नेत्यांच्या दारात नेऊन टाकणारे असे अनेक कार्यकर्ते सध्या गावात चौथा राजकीय गट निर्माण करत आहेत विशेष म्हणजे या निर्माण होणाऱ्या चौथ्या राजकीय गटाचे नेतृत्व कोणी करावे यावर असंख्य कार्यकर्त्यांचे एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे .
सध्या गावात सहकार महर्षी वसंतराव मोहिते जवाहरचे संचालक अण्णासाहेब गोटखिंडे आणि मा आ प्रकाश आवाडे यांचे समर्थक अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन राजकीय गट कार्यरत आहेत ग्रामपंचायत मोहिते गटाच्या ताब्यात आहे पदासाठी राज्याच्या राजकारणात ज्या पद्धतीच्या घडामोडी घडत आहेत अगदी तशाच घडामोडी यळगूड गावच्या राजकारणात घडत आहेत प्राप्त परिस्थितीवरून अगदी कट्टर मानला जाणारा कार्यकर्ता सुद्धा आपल्या नेत्याची उणी दुनी भरचौकात काढताना पहायला मिळत आहे त्यामुळे चौथ्या राजकीय गटाचा उदय अत्यल्प काळात होण्याची शक्यता आहे कारण प्रभाग चार आणि पाच मध्ये सुरु असलेल्या जोर बैठका कोणावर तर अविस्वास दाखवणाऱ्या ठरत आहेत निर्माण झालेला हा अविस्वास हातकणंगलेच्या पेठेत नेऊन टाकण्याचे काम जी मंडळी करत आहेत तीच मंडळी भविष्यात चौथ्या राजकीय गटाचे नेतृत्व करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे .
नको अपमान, मिळवू मान
गावात असे अनेक पदाधिकारी आहेत की त्यांना केवळ फोटोत गर्दी दिसावी म्हणून कार्यक्रमांचे निरोप मिळतात आणि ते पदाधिकारी देखील कामाची सुट्टी काढून अगदी दिवाळी सारखे नटून थटून कार्यक्रमाला हजेरी लावतात त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना लोक फोटोतले पदाधिकारी म्हणून हिनवत असतात आपल्या होणाऱ्या या घोर अपमानातून आपण आता मुक्त व्हायला हवे ही भावना जागृत झालेले अनेक पदाधिकारी चौथ्या राजकीय गटात सामील होऊन मान मिळवण्याच्या तयारीत आहेत .
मात्तबरांची मांदीयाळी
गावच्या राजकारणात उदयाला येत असलेल्या चौथ्या राजकीय गटाबद्दल गावात असणाऱ्या तिन्ही पारंपरिक राजकीय गटातील काही कार्यकर्ते उलट सुलट बोलत आहेत मात्र राजकारणात गटाचे अस्तित्व ठळक करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ, आर्थिक ताकद आणि कुशल नेतृवाची गरज असते या तिन्ही गोष्टी अगदी ठासून भरलेल्या अनेक मात्तबरांची मांदीयाळीच यळगूड गावात आहे त्यामुळे गावात सुरु असलेल्या उलट सुलट चर्चा बिनबुडाच्या आणि निरर्थक ठरत आहेत.