Spread the love

शहर प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी महापालिकेच्या कर विभागाच्या वतीने थकीत घरफाळा वसुलीसाठी सांगली नाका परिसरातील एका अपार्टमेंटमधील चार दुकान गाळे व चार फ्लॅट सील करण्यात आले. एकाच बहुमजली इमारतीमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

 इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्ष संपत आल्याने घरफाळा वसुलीचे उदीष्ट साध्य करण्यासाठी  पालिकेने नेमण्यात आलेल्या भरारी पथकामार्फत जोरदार कारवाई सुरू आहे. पालिकेने थकीत घरफाळा वसुली साठी नेमलेल्या पथक क्रमांक दोन च्या वतीने गुरुवारी एका बहुमजली इमारतीवर  मोठी कारवाई करण्यात आली.सांगली नाका परिसरातील बाबासो पाटील व्हीला अपार्टमेंट मधील ४ फ्लॅट व ४ गाळेधारकांचा घरफाळा थकीत आहे. सदर घरफळा वसुलीसाठी या अपार्टमेंटमधील २०२९३६ रुपयांच्या थकित घरफाळ्या पोटी ४ दुकान गाळे सिल करण्यात आले. तर १८०१५१ रुपयांच्या थकबाकी वसुली करिता ४ फ्लॅट सील करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पथक क्रमांक दोन मधील पथक प्रमुख अनिस पठाण यांचेसह रणजित आवळे, अरिफ नदाफ, नरेद्र देशपांडे, परसराम कांबळे, संतोष लाखे,व लता आवळे या कर्मचाऱ्यांनी केली.