मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
पश्चिम महाराष्ट्र हा आधी शेतकरी कामगार पक्ष नंतर काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, आता भाजपने या बालेकिल्ल्यांची धुळदान उडवली आहे. त्यांच्या ठिकऱ्या ठीकऱ्या उडवल्या आहेत, असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. लोकसभेला काहीशी पीछेहाड झाली होती. मात्र, त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत आपण काढल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पक्षांतरासाठी अनेकांची धावपळ सुरु
कधी कधी आपलीच ताकद आपल्याला माहीत नसते, ताकदीची जाणीव करुन देण्यासाठीच ही कार्यशाळा आहे असे पाटील म्हणाले. जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्याकडून कोण लढू शकते? याचा याचा विचार करुन त्यांना ताकत द्या असेही पाटील म्हणाले. सध्या पक्षांतरासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. नुकतेच धनंजय महाडिक यांनी स्टेजवरच बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील काही जणांची यादी दिली आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. लवकरच त्यांचा प्रवेश करून घेऊ असेही पाटील म्हणाले. तसं झाल तर जिल्ह्यात विरोधकच बाकी राहणार नाही असेही पाटील म्हणाले. काही जण आता काळ्या जादूबद्दल बोलत आहेत. मात्र, आपले आता 227 आमदार आहेत. काळी जादू करुन सुद्धा काही फरक पडणार नाही असेही पाटील म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपची मोठी ताकद वाढल्याचं चित्र
अलिकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात भाजपची मोठी ताकद वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोटी ताकद पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये होती. शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, अलिकडच्या काळात या बालेकिल्ल्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांनी टोला लगावला आहे. भाजप शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याची धुळदान उडवली असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात केलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात आणि विशेषत पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हादरा बसला होता. अनेक ठिकाणी त्यांच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकी राज्यात भाजपने जोरदार जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळाले.
