Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
‘जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे. आम्ही टप्प्यात आणून जयंत पाटलांचा कार्यक्रम करतोय ‘ अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केली .सांगलीच्या कवठेमहाकाळ मध्ये बहुजन समाजातर्फे सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते . जयंत पाटील यांच्यावर मी बोलतोय म्हणता तुम्ही ..पण हे जयंत पाटील मला किती विरोध करतोय !जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे . असंही ते म्हणाले.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?
जयंत पाटील हा कपटी माणूस आहे .जयंत पाटील हे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात असे मला एक जण म्हणाला .पण आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली .जत मध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केला .पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचे .तुम्ही सांगायची गरज नाही .जयंत पाटील हे टप्प्यात आणून काम करतात असे एक जण म्हणाला पण आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय .जयंत पाटील यांच्यावर मी बोलतोय म्हणता तुम्ही ..पण हे जयंत पाटील मला किती विरोध करतोय! जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे. मी विधान परिषदेच्या आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला. निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला .तुम्ही खोटी माहिती दिली आहे .अर्ज बाद करा .हे नियोजन जयंत पाटील यांचेच असेही पडळकर यांनी सांगितले . दरम्यान, यापूर्वीही पडळकरांनी जयंत पाटलांवर जहरी टीका केली होती.
जत तालुक्यात जयंत पाटील यांनी आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी चाचपणी केली. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात देखील चाचपणी केली, पण सगळीकडचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असे पडळकर म्हणाले. त्यामुळे सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची वेळ गेली आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर आता राजकारण होत असते तर मी आमदार झालो नसतो, असेही पडळकर म्हणाले होते.
न्यायालयात याचिका
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे ओळखल्या जाणाऱ्या भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काँग्रेसचे पराभूत उमेदवार किरण सावंत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे .सावंत यांनी न्यायालयात धाव घेत पडळकर यांचा आमदार केलाच आव्हान दिलं आहे . मतदार संघात बोगस मतदान झाले असून त्याचा फायदा पडळकर यांना झाल्याचही याचिकेत म्हटले आहे . या प्रकरणावर 28 फेब्रुवारीला सोनावणे होणार आहे .दरम्यान हे सगळे नियोजन जयंत पाटलांचे असल्याचे सांगत आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे .