Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे परभणी आणि वाशिम जिल्हाप्रमुखांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. नांदेड येथील एकनाथ शिंदेंच्या आभार यात्रेत उध्दव ठाकरेंना झटका दिला आहे. दोन जिल्हा प्रमुखांचा एकाचे वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड इथं शिवसेनेत प्रवेश झाला. यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे परभणी आणि वाशिम जिल्हाप्रमुख यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परभणी येथील उध्दव ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम आणि सहकाऱ्यांचा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे वाशिम जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला आहे. या दोन्ही प्रवेशामुळं शिवसेना शिदे गटाची परभणी आणि वाशिमध्ये ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.