Young indian farmer in depression.
Spread the love

शहापूर/महान कार्य वृत्तसेवा
शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सक्तीचे केले असून शेतकरी आपला आधार लिंक मोबाईल आधारकार्ड व 712 घेऊन आधार सेंटर, सी.एस.सी. सेंटर व तलाठी कार्यालय अशा ठिकाणी धावपळ करून आपले फार्मर आयडी बनविण्यासाठी मागील दहा-पंधरा दिवसापासून प्रयत्न करीत आहेत. परंतु सर्व्‌‍हर डाऊन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.
शेतकरी आयडी बनवतांना कधी सर्वर डाऊन, तर कधी आधार कार्डवरील माहिती परिपूर्ण असताना बहुतांश केंद्रावर शहापूर तालुका गायब झाल्याचे दिसून येत आहे.कधी शेतकरी फोटो दिसत नाहीत. त्यामुळे पुढील 712 किंवा ओटीपी येणे थांबते. दरम्यान ऑपरेटर देखील खूप प्रयत्न करून सुद्धा नोंदी होत नाहीत याबाबतची माहिती शहापूर तहसीलदाराच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना 200 ते 250 रुपये खर्च करूनही फार्मर आयडीपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तलाठी कर्मचारी ऑनलाईन तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे करत आहेत. तो दूर करण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तालुक्यातील भातसई, शेरे, शेई, अंबर्जे, मासवणे, नडगाव, डोळखांब, बाबघर इ. भागातील शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही. यामुळे ते हैराण आहेत. पीएम किसानचा 19 वा हप्ता 24 फेबुवारी रोजी वितरित होत असून, फार्मर आयडी अभावीशेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत .