Spread the love

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
छत्रपती शिवरायांची त्यांच्या आयुष्यात मुल्यांशी आणि निष्ठांशी कधीही तडजोड केली नाही. शिवरायांनी कधीच वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करिण्याकरीता त्यांनी उभे आयुष्य झिजवले. त्यांच्याबद्दल अभद्र बोलणाऱ्या राहुल सोलापूरकर याला दिसेल तिथे ठेचून काढा. खरे तर अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशा शब्दात शिवरायांचे 13 वे वंशज तथा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.
छत्रपती शिवाजीराजे हे औरंगजेब बादशाहला लाच देऊन आर्ग्यातून निघून आले होते, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर याने केले. सर्वत्र टीकेनंतर त्याने दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
राहुल सोलापूरकरची जीभ हासडली पाहिजे
राहुल सोलापूरकर हा कोण आहे? त्याचे विधान ही चूक नाही तर घोडचूक आहे. अशा व्यक्तींच्या जिभा हासडल्या पाहिजेत. समाजात अशाच विकृतांमुळे तेढ निर्माण होते. समाजातील अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे, असे उदयनराजे भोसले म्हणाले.
राहुल सोलापूरकर सारख्या प्रवृत्तींना गोळ्या घालून मारलं पाहिजे
राहुल सोलापूरकर सारख्या प्रवृत्तींना गोळ्या घालून मारलं पाहिजे. शिवरायांनी लाच दिली म्हणणारे सोलापूरकर ही तर औरंजेबाची अवलाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल सोलापूरकरवर कारवाई करावी. तुरुंगात टाकून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.
ज्यां महापुरुषांनी आपले आयुष्य पणाला लावून सर्वसामान्य जनतेसाठी खस्ता रस्ता खाल्ल्या, आपले जीवन समर्पित केले त्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना ठेचलेच पाहिजे किंबहुना त्यांना गाडले पाहिजे, असा तीव संताप उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवरायांवर बोलताना राहुल सोलापूरकर नेमके काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज आर्ग्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते आर्ग्याहून बाहेर पडले. त्यामुळे इतिहास गोष्टीरुपात आला की रंजकता येते आणि रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो, असे राहुल सोलापूरकर म्हणाले.