Spread the love

वॉशिंग्टन डी. सी./ महान कार्य वृत्तसेवा
मध्य आशियातील तणाव निवळावा आणि परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी अमेरिका गाझाचा ताबा घेईल. सुरक्षेचा विचार करुन गाझातील नागरिकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन केले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांच्या घोषणेचे इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वागत केले. अमेरिकेची घोषणा प्रत्यक्षात आल्यास इतिहास बदलेल; असेही बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
गाझात शांतता राहावी आणि गाझा पट्टी इसायलच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरू नये यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावाचे इसायल मनापासून स्वागत करत असल्याचे बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. ट्रम्प यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात आल्यास गाझा पट्टीच्या इतिहिसात एक नवा अध्याय लिहिला जाईल; असेही बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
हमास आणि त्यांच्या समर्थकांनी इसायलच्या अनेक नागरिकांना स्वत:च्या ताब्यात ठेवले आहे. या नागरिकांची सुखरुप सुटका करावी आणि त्यांना इसायल सरकारच्या ताब्यात द्यावे. गाझा पट्टीत शांतता निर्माण करण्यासाठी हमासची ही कृती सहाय्यक ठरू शकते, असे बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. इसायलच्या सीमांवर शांतता नांदावी एवढीच माफक इच्छा असल्याचे बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले.
ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू गेले होते. या भेटीत नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यात गाझातील परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेअंती ट्रम्प यांनी गाझा संदर्भात नवा प्रस्ताव जाहीर केला आहे.