Spread the love

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांत अंगणवाडीमधील रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात कामासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
शिक्षण आणि वयोमर्यादा
महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सध्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी 12वी पास असणे गरजेचे आहे. तसेच पदव्युतर, डी एड, बी एड आणि एमएससीआयटी कोर्स पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी 18 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.
या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. याबाबत अर्जप्रक्रिया सुरु झाली असून 18 फेब्रुवारी 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. तसेच या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला नगर परिषदनगर पंचायत नगर पालिका नगर पंचायत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील असणे गरजेचे आहे. रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे गरजेचे आहे.