भिंवडी/ महान कार्य वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्याची देशभरात चर्चा असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कुंभमेळ्यासाठी येत आहेत. त्यामध्ये, अगदी गृहमंत्री अमित शाहांपासून ते उद्योगपती अंबानी व अनेक सेलिबिटींनीही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातूनही अनेक भाविक कुंभमेळ्याला जाऊन पवित्र स्नान करत आहेत. गंगा नंदीत डुबकी मारुन आनंद घेत आहेत. भक्ती आणि शक्तीचा संगम सध्या प्रयागराज येथे पाहायला मिळत असून सोशल मीडियातूनही भाविक आपला अनुभव व फोटो शेअर करताना दिसून येतात. एकीकडे हिंदू धर्मियांची महामेळा म्हणून कुंभमेळ्याचं पावित्र व महत्त्व अधोरेखीत केलं जात असताना काही समाजकंटकांकडून कुंभ मेळ्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. भिंवडीतील एका तरुणाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बजरंग दलाने आक्षेप घेत थेट पोलिसांत धाव घेतली.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह आणि अील वक्तव्य करणाऱ्या माजीद मंसुरी या तरुणाविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दल भिवंडीच्यावतीने अशोक महाडिक यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक न केल्यास तीव आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. संबंधित तरुणाने सोशल मीडियावर ऑडिओ संदेशाद्वारे कुंभमेळ्याबाबत अील भाषा वापरून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तसेच, हिंदू धर्मियांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी संतप्त नागरिक आणि विविध हिंदू संघटनांनी केली आहे. या घटनेमुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, पोलिस प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सध्या प्रयागराजमधील सांधू, संत, महंतांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या साधू महाराजांची तपश्चर्या आणि त्यांनी अनेक वर्षांपासूनची सेवा चर्चेत विषय ठरत आहे. तर, काही दिवसांपूर्वीच प्रयागराज येथे चेंगराचेंगरीची घटना घडून अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता.