Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
संतोष देशमुख हत्या प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी उडी घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे . गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात वाल्मीक कराडशी निकटचे आणि आर्थिक संबंध असल्याचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होतोय .दरम्यान, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे निर्दोष असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मनोज जरांगेंनी हा जातीयवादाचा अंक असल्याचा आरोप केला होता .आता धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन नामदेव शास्त्री यांनी वंजारी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. नामदेव शास्त्रींनी त्यांचे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याने मराठा समाज आक्रमक
भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती मराठा कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना केली आहे . महंत व नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं या निवेदनात म्हटलंय .मराठा समाजाच्या भावना त्यांच्या वक्तव्यामुळे तीव झाल्या आहेत .त्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे .हे वक्तव्य त्यांनी मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे असेही या निवेदनात म्हंटलंय .