चंदगड | महान कार्य वृत्तसेवा
ध्वजाचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अंकुश बोकडे व उपाध्यक्षा सौ ज्योती कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री जोतिबा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच यावेळी पंचायत समिती चंदगडचे गटशिक्षणाधिकारी श्री वैभव पाटील, अभियंता श्री सदावरे यांच्या सहकार्याने दुरुस्ती केलेल्या दोन वर्गखोल्याचे उद्घाटन ग्रामपंचायत मजरे कारवेच्या ग्रामसेविका श्रीमती सुरेखा गिरीबुवा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जोतिबा पाटील यांनी शाळेत बांधलेल्या ग्रंथालय व प्रयोगशाळा ,मजरे कारवे गावातील अक्वा अलॉईज कंपनी येथे नोकरी करणारे सर्व कर्मचारी व्यक्ती व व्यवस्थापक सो यांचेमार्फत शाळेसाठी 3 लाख रुपये किंमतीची स्लॅपवर उभारलेली पत्रा शेड तसेच काही तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहीलेल्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी माजी आमदार श्री राजेश पाटील साहेब यांच्या सहकार्याने 11 लाख निधी मंजूर होऊन चालू असलेल्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती सांगितली. या सर्व कामासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व आजी व माजी अध्यक्ष, सदस्य व सदस्या , सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायतील सर्व सदस्य व सदस्या, पालक तसेच गावातील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे सहकार्य लाभले.तसेच मुलांसाठी हनुमान दूध संस्था मजरे कारवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश बोकडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी सदस्या सौ मनिषा पाटील, ग्रामपंचायत मजरे कारवे यांनी खाऊ दिला.यावेळी सरपंच श्री शिवाजी तुपारे, उपसरपंच श्री पांडुरंग बेनके, पोलीस पाटील सचिन कांबळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अंकुश बोकडे, उपाध्यक्षा ज्योती कांबळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री निंगाप्पा बोकडे, नितिन पवार,उत्तम तुपारे, जयवंत हारकारे सदस्या सौ अंजली सुतार, सुनिता पाटील ,शाळेतील अध्यापिका सौ संगिता जळगेकर,सौ सुजाता कांबळे, सौ नेहा पाटील, अंगणवाडी सेविका सौ रेखा पाटील, सौ दिपा बोकडे , पत्रकार नारायण गडकरी प्रकाश ऐनापूरे अंगणवाडी मदतनीस, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.