खटाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते करण्यात आला. सोमेश्वर विद्यालय खटाव ध्वजारोहण पोलीस पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद केंद्र शाळेचे ध्वजारोहण माजी सैनिक यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर जिल्हा परिषद केंद्र शाळा व सोमेश्वर विद्यालय यांच्या मुला मुलींचे सत्कार माजी सैनिक यांच्याकडून करण्यात आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर लेझीम व देशभक्तीपर गाणे म्हणत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.