सचिव महेश मानेवर गुन्हा दाखल
हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
मुडशींगी ता. हातकणंगले येथील पांडूरंग विकास संस्थेत 1 लाख 80 रुपयांच्या अपहार प्रकरणी तात्कालीन सचिव महेश रामचंद्र माने (रा. अतिग्रे ता. हातकणंगले) याचे विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखा परिक्षक अशोक बाबुराव बिरंजे (रा. वाकरे, ता. करवीर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. संशयीत याने पदाचा गैरवापर करुन संस्थेतील 1 लाख 80 हजार रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरून संस्थेची फसवणूक केली आहे.
पांडूरंग संस्थेत महेश रामचंद्र माने एप्रील 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत सचिव म्हणून कार्यरत होते. या कालावधीत कीर्दी प्रमाणे हात शिल्लक रक्कम 1 लाख 80 हाजार 460 रूपये इतकी असताना त्यापैकी 1 लाख 80 हाजार इतकी रक्कम येणे अनामत खाते त खर्च दाखवून ती जिल्हा मध्यवर्ति बँकेच्या खात्यावर जमा करणे आवश्यक असताना ती रक्कम बँकेत जमा न करता माने यांनी स्वतःच्या फायद्याकरिता वापरून संस्थेची आर्थिक फसवणुक केल्याने माने विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.