38 लाखांचा अपहार; फरार सचिव रमेश लोंढेचे पोलिसांसमोर आत्मसर्मपण
पुलाची शिरोली/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेत 38 लाखांचा अपहार प्रकरणी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष,संचालक मंडळ, सचिव व प्रमाणित लेखा परीक्षक यांच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तर मंगळवारी फरार असलेला सचिव रमेश लोंढे याने पोलिसांसमोर हजर होवून आत्मसर्मपन केले. विशेष लेखा परीक्षक राजेश हंकारे यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान शेतकऱ्याच्या दुधावर ताव मारणाऱ्या संचालकांची पोलिसांनी कोणतीही बडदास्त ठेवू नये, अशी मागणी दूध उत्पादकांची आहे.
कामधेनू दूध संस्थेची सहा महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. या निवडणुकीत अपहाराचा विषय गाजला होता.
नूतन चेअरमन, संचालक व दूध उत्पादकांनी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाचे फेर लेखा परीक्षण करण्याची मागणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांच्याकडे केली होती. मागणीनुसार आर. जे. हंकारे यांची लेखा परिक्षक म्हणून नेमणूक केली होती. हंकारे यांनी संस्थेचे सचिव लोंढे यांनी उपलब्ध करून दिलेले दप्तर व इतर संस्थेचे सादर केलेले खाते उतारे, या अनुषंगाने तपासणी केली असता 38 लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले.
असा झाला अपहार
या तपासणी नुसार संस्थेचे दूध उत्पादक सभासद यांचे नावे टाकलेले रोख स्वरूपातील डव्हान्स,पशुखाद्य ॲडव्हान्स, बाहेरील खासगी कंपनीचे पशुखाद्य खरेदी व्यवहार, किरकोळ दूध विक्री, ॲडव्हान्स येणे रक्कम, म्हैस दूध खरेदी रक्कम, संस्था शेअर्स वर्गणी, शिल्लक माल(पशुखाद्य व इतर), जंत औषध खरेदी विक्री व्यवहार, सँपल दूध विक्री, किरकोळ दूध विक्री, ॲडव्हान्स येणे रक्कम,पशुखाद्य रकमेचा वसूल वैयक्तिक खात्यावर वर्ग करणे, येणे ॲडव्हान्स रक्कम वसूल करून वैयक्तिक खात्यावर वर्ग करणे, दूध खरेदी रक्कम, बोगस दूध खरेदी रक्कम, प्रॉव्हीडंड फंड वर्गणी, संस्था ठेव रक्कम, संस्था शेअर्स वर्गणी देणे रक्कम, बोगस दूध ॲडव्हान्स आदी 18 व्यवहारांमध्ये 38 लाख 80 हजार 126 रुपये 2 पैसे इतक्या रकमेचा गैरव्यवहार व अपहार झाला आहे.
यांच्या आवळल्या मुसक्या
तत्कालीन चेअरमन उमा चौगुले, व्हाईस चेअरमन महंमद हजारी, सचिव रमेश लोंढे ,प्रमाणित लेखापरीक्षक महादेव परीट,संजय चौगुले, बशीर हजारी, बेबी हजारी, गुंडा कांबरे, संजय सावंत, सुशिला गोरड, महंमद हजारी, सुभाष चौगुले, विजय मगदूम, हसन बारगीर, किरण चौगुले, पूजा चौगले
