Spread the love

तैपाई/महान कार्य वृत्तसेवा
मूल नको म्हणून बरेच पर्याय उपलब्ध आहेत. गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम आणि नसबंदी शस्त्रक्रिया. एका डॉक्टरने स्वत:च स्वत:ची नसबंदी केली आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे त्याने आपली नसबंदी शस्त्रक्रिया करताना सर्जरीचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्टही केला आहे.
तैवानमधील डॉक्टर चेन वेई-नोंग. तैपेई शहरातील प्लास्टिक सर्जरी क्लिनिकमध्ये तो प्लॅस्टिक सर्जन आहे. त्याला 3 मुले आहेत. त्याच्या पत्नीला यापेक्षा अधिक मुले नको. तिला खूश करण्यासाठी म्हणून स्वत:ची नसबंदी करून घेतली.
चेनने स्वत:ला लोकल ॲनेस्थेशिया देऊन ऑपरेशन सुरू केले. पण स्वत:चे ऑपरेशन करणे सोपे नाही, त्यामुळे केवळ 15 मिनिटे लागणारी शस्त्रक्रिया चेनने 1 तासात पूर्ण केली. हे ऑपरेशन यशस्वी झाले आणि चेन देखील ठीक आहे. चेन म्हणाला, स्वत:ची नसबंदी करणे हा खूप विचित्र अनुभव होता. जर स्त्रियांची नसबंदी करायची असेल तर ती प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे, पण पुरुषांमध्ये ती सोपी प्रक्रिया आहे.
डॉक्टरच्या नसबंदीवर कमेंट
चेनचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्याच्या धाडसाचे आणि पत्नीवरील प्रेमाचे कौतुक केले, पण अनेकांनी चिंताही व्यक्त केली. असे करणे सुरक्षित नसून मोठी दुर्घटना घडू शकते असे लोकांनी सांगितले. काही लोकांनी त्याला तैवानमधील सर्वात निडर व्यक्ती असेेही म्हटले.
अशी बरीच कामे आहेत, ज्यात आपण मास्टर असलो तरी ते स्वत:साठी करता येत नाही. इतरांकडून करून घ्यावी लागतात. जसे की बार्बर कितीही चांगला असला तरी तो स्वत: स्वत:चे केस कापत नाही, दुसऱ्यांकडून कापून घेतो. डॉक्टरांचंही तसंच आहे. एक डॉक्टर कितीही अनुभवी, मोठा सर्जन असला तरी तो स्वत: स्वत:ची शस्त्रक्रिया करू शकत नाही. त्याला दुसऱ्या डॉक्टरची गरज असते. असं असताना तैवानमधील या डॉक्टरने मात्र सगळ्यांनाच धक्का दिला आहे.
हा माणूस कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणीत सापडला नाही कारण तो डॉक्टर होता आणि त्याच्याकडे शस्त्रक्रिया करण्याचा परवानाही होता.