Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजावंदनचा अर्थ कळत नाही का? हे विचारण्याची वेळ आता आली आहे. त्यामागील कारण म्हणजे 26 जानेवारीला पालकमंर्त्यांनी ध्वजारोहण करावं, असा शासन निर्णय मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आला आहे. मुळात 15 ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं, तर 26 जानेवारीला ध्वजावंदन केल जातं. मात्र मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयात 26 जानेवारीला ध्वजावंदन ऐवजी ध्वजारोहण करावं असं स्पष्टपणे उल्लेख केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
चुकीचा आदेश व्हायरल
स्वातंर्त्यदिनाला (15 ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेत मग फडकवतात. देशाला स्वातंर्त्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जातं. तर प्रजासत्ताकदिनाला (26 जानेवारी ) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते. मात्र राजशिष्टाचार अधिकारी यांना याचा विसर पडला आहे की काय? असा प्रश्न या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता ही चूक लक्ष्यात घेत यात बदल करून नवीन शासन निर्णय जाहीर केला जातो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन करणाऱ्या मंर्त्यांची यादी जाहीर
अ.क्र. जिल्ह्याचे नाव मा. मंत्री मा. राज्यमंत्री
1) ठाणे- एकनाथ शिंदे, (उपमुख्यमंत्री)
2) पुणे – अजित पवार, (उपमुख्यमंत्री)
3) नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे
4) अहिल्यानगर- राधाकृष्ण विखे-पाटील
5) वाशिम – हसन मुश्रीफ
6)सांगली – चंद्रकांत (दादा) पाटील
7) नाशिक- गिरीश महाजन
8) पालघर- गणेश नाईक
9) जळगाव – गुलाबराव पाटील
10) यवतमाळ- संजय राठोड
11) मुंबई (शहर) मंगलप्रभात लोढा
12) मुंबई (उपनगर) – आशिष शेलार
13) रत्नागिरी- उदय सामंत
14) धुळे – जयकुमार रावल
15) जालना- पंकजा मुंडे
16) नांदेड- अतुल सावे
17) चंद्रपूर- अशोक ऊईके
18) सातारा – शंभूराज देसाई
19) बीड – दत्तात्रय भरणे
20) रायगड- आदिती तटकरे
21) लातूर- शिवेंद्रसिंह भोसले
22)नंदूरबार- माणिकराव कोकाटे
23) सोलापूर- जयकुमार गोरे
24) हिंगोली- नरहरी झिरवाळ
25) भंडारा- संजय सावकारे
26) छत्रपती संभाजीनगर- संजय शिरसाट
27) धाराशिव- प्रताप सरनाईक
28) बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
29) सिंधुदुर्ग- नितेश राणे
30) अकोला- आकाश फुंडकर
31) गोंदिया- बाबासाहेब पाटील
32) कोल्हापूर- प्रकाश आबिटकर
33) गडचिरोली- आशिष जयस्वाल
34) वर्धा- डॉ. पंकज भोयर
35) परभणी- मेघना बोर्डीकर
36) अमरावती- इंद्रनील नाईक