Spread the love

नागरीक दहशतीखाली

हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा
हातकणगले शहरात दोन दिवसांपूर्वी तरुणांच्या एका टोळक्याने हातात नग्या तलावारी, कोयते नाचवत शहारातून रॅली काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरात अद्यापही दशहतीचे वातावरण आहे. लोक भितीच्या छायेखाली आहेत. कोणाची तक्रार येण्याच वाट न पहाता पोलिसांनी त्या टोळक्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी महिलांची मागणी आहे. अन्यथा कोरोची, इचलकरंजीती टोळी युद्धाचे लोन हातकणंगलेत पोहचायला वेळ लागणार नाही. अशी चर्चा पोलीस ठाणे आवारात आहे.
हातकणंगले शहराच्या मध्यभागी असलेल्या पाच तिकटी परिसराता दररोज किरकोळ वादावादी होत असते. यातून मोठ्या हाणामाऱ्याही यापूर्वी झालेल्या आहेत. येथेच नगराध्यक्ष अर्चना जानवेकर यांच्या परिवाराचे देशी दारु दुकान आहे. त्यामुळे तळीरामांची दिवसभर वर्दळ असते. दारुच्या नशेत हाणामाऱ्या नित्याचा झाल्या आहे. तीन महिन्यापूर्वी येथून जवळच असलेल्या एका बिअरबारवर टोळक्याने एका तरुणाचा रात्रीच्या वेळी खून केला. तेव्हापासून हातकणंगलेत टोळकी तयार होवू लागली आहेत. दोन दिवसापूर्वी टोळीची दहशत माजवण्यासाठी येथील एका टोळीतील सात ते आठ तरुणांनी सायंकाळच्या सुमारास हातात नंग्या तलवारी, कोयते नाचवत शहराच्या चौका चौकातू रॅली काढली. हे सर्व तरुणांनी आमली पदार्थाची नशा करुन होते. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांची तत्परता

याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी पथकांसह गावात फेरफटका मारत तणाव कमी करण्याचा प्रयरत्न केला. प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी भयभीत झालेल्या माहिलांनी पोलीसांसमोर कैफियत मांडली. मात्र याबाबत तकार झाल्या शिवाय कारवाई करता येणार नाही. अशी भुमिका पोलिसांनी मांडली. रॅली काढलेल्या मार्गावर असलेल्या सीसीटीव्ही फूटेज मधून माहिती घेऊन पोलीसांनी कारवाई करण्याचीही मागणी नागरिकांतून होत आहे.

आमदार बापुनीं याकडेही लक्ष घालवे

या गंभीर प्रकाराकडे आमदार अशोकराव माने यांनी विशेष लक्ष दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या दबक्या भुमिकेवरही नाराजी व्यक्त होत आहे. सूतगिरणीवरील मोजक्या लोकांच्या बैठका, सत्कार समारंभातून वेळ मिळाल्या त्यांनी या गंभीर बाबींवरही पोलिसांशी चर्चा करुन कारवाई करण्यास भाग पाडावे असेही लोक बोलत आहेत.