Spread the love

अजितदादांचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्लॅन ठरला

शिर्डी/महान कार्य वृत्तसेवा
कार्यकर्ता एका पक्षाचा असतो आणि तो पक्ष वाढीसाठी घराबाहेर पडतो तेव्हा त्याची बायको असते दुसऱ्या पक्षात, मुलगा तिसऱ्या पक्षात आणि मुलगी अपक्ष आणि भावकीचा विरोध असं होता कामा नये हे अजित पवार सांगतोय, असे अजितदादांनी सांगताच एकच हशा पिकला. हे बोलताना स्वत: अजितदादांना हसू आवरले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात बोलताना अजित पवारांनी पक्ष वाढीवर जोर दिला. अजित पवारांचे हे विधान ते स्वत: पवार कुटुंबापासून वेगळी भूमिका घेत भाजप सोबत जाण्याच्या निर्णयावरून होता.
पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अधिक तरुणांना पक्षात आणले पाहिजे असे सांगत उपमुख्यमंत्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एका कार्यकर्त्याने 25 घरांची जबाबदारी घ्यावी. शिबिर झाल्यानंतर आपआपल्या गावात पोहोचल्यानंतर आदेशाची वाट न बघता पक्ष वाढीसाठी कामाला लागण्याचे सूचना अजित दादांनी केल्या.
ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकरवर दु:खाचा डोंगर कोसळला; प्रिय व्यक्तींना गमावले
पक्षाचा पुरोगामी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस असला पाहिजे, पक्ष वाढीसाठी झपाट्याने कामाला लागा, प्रत्येक गावात चौकात पक्षाचा बोर्ड आणि झेंडा लागला पाहिजे. प्रत्येक गल्लीत पक्षाचा कार्यकर्ता हवा, असे अजित दादांनी सांगितले.
मोदींना विचारले किती वाजता उठता?
काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. यावेळी आमदारांसोबत मोदींनी त्यांचे अनुभव शेअर केले. मी मोदी साहेबांना विचारले तुम्ही किती वाजता उठता, यावर ते म्हणाले- मी फक्त 3 तास झोपतो. रोज 3.30 ला उठतो. रोज योगा आणि व्यायाम करतो. मी शरिराला वेळ देतो. त्यांनी आम्हाला सांगितले मी देखील तुम्हाला सांगतो की प्रत्येकाने स्वत:चे आणि कुटुंबाचे वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली पाहिजे. तुमची तब्येत चांगली असेल तर आपण काम करू शकतो, असे अजितदादा म्हणाले.

अजित दादांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • दर मंगळवारी कॅबिनेटची बैठक होणार
  • लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
  • गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळणार
  • प्रत्येक महिन्याला सर्व आमदारांची बैठक होणार