Spread the love

सिलिंडरचा स्फोट, फायर बिगेडच्या गाड्या तातडीने रवाना

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
प्रयागराज महाकुंभमेळा परिसरात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभमेळा परिसरातील शास्त्री बिज सेक्टर-19 कॅम्पमध्ये भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तंबूत जेवण तयार होत असताना ही आग आल्याची प्राथमिक माहिती आली आहे. आग लागल्यानंतर अनेकदा सिलेंडरचे ब्लास्ट झाले. त्यानंतर 20 ते 25 तंबूंना आग लागल्याची माहिती मिळाली आहे.


आकाशात धुराचे लोट उठत असल्याचे पाहून संपूर्ण महाकुंभमेळ्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर साधू संतांनी आश्रम रिकामे केले अन्‌‍ सुरक्षित स्थानी धाव घेतली. अग्निशमन दलच्या गाड्या तातडीने पोहोचल्या असून भाविकांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे.