शिरोळ/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
शनिवारी 18 जानेवारी रोजी माध्यमिक विभागाकडील बालाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी ता.हातकणंगले,प्राथमिक विभागाकडे कुमार विद्यामंदिर टाकवडे केंद्र नांदणी तालुका शिरोळ.या दोन्ही शाळेतील शिक्षकांसाठी कॉफी विथ कलेक्टर या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी या दोन्ही शाळेतील शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी यांनी शाळेत केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत व शैक्षणिक कामकाजाबाबत सुसंवाद साधला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त कुमार विद्यामंदिर टाकवडे या शाळेस आज हा सन्मान मिळाला. सदर कार्यक्रमामध्ये शाळेतील उपक्रमांचे पीपीटीद्वारे शाळेचे ज्येष्ठ अध्यापकप्रकाश खोत तसेच बालाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.रावळ यांनी व शिक्षक वृंद यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि निवडणूक प्रक्रिया तसेच इयत्ता पहिली प्रवेश संदर्भात शाळेने केलेल्या उपक्रमांचे माननीय जिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले. शिक्षकांच्याकडून अपेक्षा व्यक्त करताना जिल्हाधिकारी म्हणाले की बदल घडवणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे आणि तो दोन्ही शाळा यशस्वीरित्या पूर्ण करीत आहेत.चांगल्या कामाची दखल घ्यावी त्यांचे काम इतरांच्या समोर जावे यासाठी हा कॉफी विथ कलेक्टर हा उपक्रम मी चालू केला असल्याचे सांगितले. शेवटी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक एस.के.यादव यांनी आभार मानले.याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर, शिरोळ तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, नांदणी केंद्राचे केंद्रीय प्रमुख शिवाजी भोसले, कुमार विद्यामंदिर टाकवडेचे मुख्याध्यापक अरुण कदम, प्रकाश खोत, तुषार घाडगे, चंद्रकांत नाईक, मायाप्पा कांबळे, सौ.अर्चना परीट, सौ.अर्पणा परीट शिक्षकवृंद उपस्थित होते.