भेंडवडे/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 14 जानेवारी रोजी पानिपत (बसताडा) हरियाणा येथे देशभरातील अनेक मराठी शिवप्रेमी शौर्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांना, राष्ट्रपती सन्मानित, डॉ.अल्पना चौगुले यांनी रेखाटलेले शिवराज्याभिषेक सोहळा पेंटिंग देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा जागृती मंचचे वीरेंद्रजी वर्मा, थोर इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे, मंचाचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील, कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव, बसताडा गावचे सरपंच सुरेश फौजी व स्वामी स्वपुर्णाआनंद , डॉ सोपान चौगुले व देशभरातून आलेले मराठी शिवप्रेमी संघटना व हरियाणातील शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी कोल्हापूरचे डॉ. सोपान चौगुले यांनी सांगितले की हे चित्र भावी पिढीस आपल्या इतिहासाची आठवण व सदोदित प्रेरणा देत राहील असे सांगितले. त्याचप्रमाणे प्रा. किरण पाटील कोल्हापूर यांनी महाराजांचा स्फूर्तीदायी पोवाडा आपल्या खड्या आवाजातून लोकांना मंत्रमुग्ध केले. अनेकांनी स्फूर्तीदायक कला सादर केल्या. डॉ. वसंतराव मोरे यांनी आपल्या आयुष्याची बहुमूल्य वर्ष खर्च करून हरयाणातील रोड मराठा यांची स्वतःची ओळख त्यांच्या संशोधनातून सिद्ध करून ते पानिपत येथे लढलेले मावळे यांचे वंशज असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मानपत्र व रोख रक्कम एक लाख व शिवराज्याभिषेक पेंटिंग देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मराठा जागृती मंच व श्री मिलिंद पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे अनेक वर्षे श्री मिलिंद पाटील, डॉ. वसंतराव मोरे व मराठा वीरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.