लातूर/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
चाकूर पोलीस स्टेशन येथे व्यापारी बांधव व पोलीस यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये व्यापार्यांकडून आठवडी बाजार, वाहनांची पार्किंग व्यवस्था आदी समस्यांच्या बाबतीत चर्चा केली.
बैठकीस मार्गदर्शन करतांना Aएएसपी रेड्डी यांनी व्यापार्यांना एक कॅमेरा पोलिसांसाठी म्हणून प्रत्येक व्यापार्यांनी आपल्या दुकानासमोर रस्ता स्पष्ट दिसेल अशा पद्धतीचा एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घ्यावा. जेणेकरून एखादी घटना घडल्यास सीसीटीव्ही कॅमेरामुळे तात्काळ त्याची शहानिशा करता येईल. त्यामुळे एक कॅमेरा पोलिसांसाठी बसवण्यात यावा असे आवाहन केले. आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापार्यांनी कॅमेरे बसवण्याचे मान्य केले. बैठकीस पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पंकज निळकंठे, चाकुर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व पत्रकार बांधव हजर होते.